गुलवीर सिंगला सुवर्ण   

नवी दिल्ली : आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप मध्ये गुलवीर सिंग याने पुरुषांच्या १० हजार मीटर स्पर्धेत अव्वल स्थान मिळवत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. अशी कामगिरी करणारा गुलवीर हा तिसरा भारतीय ठरला.भारताचा राष्ट्रीय विक्रम करणारा गुलवीर याने सर्वोत्तम कामगिरी केली. त्याच्या कामगिरीमुळे तो अंतिम पाचमध्ये पोहचला. त्याने शेवटच्या फेरीत २८:३८.६३ अशी वेळ नोंदवत अल्बर्ट किबीच याला मागे टाकले आणि सुवर्ण पदकावर नाव कोरले. 

Related Articles